Breaking News

भारतासमोर तगडे आव्हान

चौथ्या दिवशीही गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका

सिडनी : वृत्तसंस्था
सिडनी येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसर्‍या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपताना भारताने दोन विकेट्सच्या बदल्यात 98 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजूनही 309 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाच्या दुसर्‍या सेशनपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या बदल्यात 312 धावा केल्या होत्या आणि 406 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने आपला डाव घोषित केला असून टीम इंडियासमोर विजयासाठी 407 धावांचे आव्हान ठेवले आहे.
   तिसर्‍या दिवसाप्रमाणेच चौथ्या दिवशीही भारतीय संघाने गचाळ क्षेत्ररक्षण करीत झेल सोडले. त्यामुळे गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका भारतीय संघाला बसला. स्मिथ, ग्रीन आणि लाबूशेन यांना भारतीय खेळाडूंनी जीवनदान दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर डोंगराएवढे आव्हान ठेवले आहे. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताला रवींद्र जडेजाची कमी जाणवत होती. पहिल्या डावात फलंदाजी करताना जडेजाच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो बॉर्डर-गावसकर मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे दुसर्‍या डावात फलंदाजी करतानाही भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. सामना वाचवण्यासाठी आता भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे.डोंगराएवढ्या आव्हानाचा सामना करताना भारतीय संघ कशी फलंदाजी करतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सिडनी कसोटीच्या तिसर्‍या दिवसावर कांगारूंनी वर्चस्व मिळवले होतेच. चौथ्या दिवशी त्यांनी सामन्यावर चांगलीच पकड मिळवली. सकाळच्या सत्रात काल नाबाद राहिलेल्या मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांनी अर्धशतके झळकावून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वाढवली. कॅमरून ग्रीन (84), स्मिथ (81) आणि लाबूशेन (73) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सहा गड्यांच्या मोबदल्यात 312 धावा चोपल्या. भारताकडून सैनी आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले, तर सिराज आणि अश्विनला प्रत्येकी एक-एक बळी मिळवता आला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply