Breaking News

देवदूत मयूर शेळके यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकात एका लहान मुलाचा जीव वाचवणारा देवदूत मयूर शेळके यांना कोकण विभाग पत्रकार संघाने कोकण शौर्य हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे.

कोकण विभाग पत्रकार संघाचा वर्धापन दिन सोहळा बुधवारी (दि. 28) मुरबाड तालुक्यातील संगम येथील देशमुख मराठा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार राजेंद्र गावित, आमदार किसन कथोरे, आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत मयूर शेळके यांना राज्यस्तरीय कोकण शौर्य देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक बोराडे यांनी दिली.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply