Breaking News

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘पनवेल टाइम्स’च्या विशेषांकाचे प्रकाशन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

गणेश कोळी संपादित ‘पनवेल टाइम्स’च्या नववर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘पनवेल टाइम्स’ला शुभेच्छा देत नववर्षारंभ विशेषांकाचे कौतुक केले.  या वेळी ‘पनवेल टाइम्स’चे संपादक गणेश कोळी, पनवेल तालुका भाजप माजी अध्यक्ष महेंद्र पाटील, समाजसेवक बाबा कदम-आडवलकर आदी उपस्थित होते. दरवर्षी नववर्षानिमित्त वेगवेगळ्या विषयांवर ‘पनवेल टाइम्स’ने नववर्षारंभ विशेषांक प्रकाशित केले आहेत. जागतिक कोरोना संकटामुळे 2020 हे वर्ष सर्वांनाच आव्हान देऊन गेले. ‘पनवेल टाइम्स’च्या नववर्षारंभ विशेषांकात जागतिक कोरोना महामारी ः संकटातून नवी शिकवण, कोरोना ः योगिक दृष्टिकोन, शिक्षक ः उपेक्षित कोरोना योद्धा आदी साहित्य प्रसिद्ध आहे. ‘पनवेल टाइम्स’चे आतापर्यंतचे नववर्षारंभ विशेषांक महाराष्ट्रातील साहित्यिक, लोकप्रतिनिधी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाले आहेत.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply