Breaking News

तीन वाहनांना ठोकर देवून ट्रक दरीत कोसळला

बोरघाटातील अपघातात जीवित हानी नाही

खालापूर : प्रतिनिधी

ब्रेक निकामी झाल्याने वाशी (नवी मुंबई) कडे जाणारा ट्रक बोरघाटात तीन वाहनांना ठोकर देवून 50 फुट  खोल दरीत कोसळला. ट्रक चालक व त्यांच्या साथीदाराने प्रसंगावधान दाखवून बाहेर उड्या मारल्याने त्या दोघांचा जीव वाचला आहे. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास ढेकू गावाच्या हद्दीत घडला.

कर्नाटक येथून आले घेउन वाशी मार्केटकडे निघालेल्या ट्रकचा मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील ढेकू गावाच्या हद्दीत ब्रेक निकामी झाला. त्यामुळे या ट्रकने पुढे असलेल्या तीन वाहनांना ठोकर दिली. व सुमारे दोन कि.मी. पुढे जावून ट्रक ट्रक 50 फुट खोल दरीत कोसळला. दरम्यान, ट्रक चालक व त्यांच्य साथीदाराने बाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे. सूरज पाटील (रा. ढेकू) यांनी आपल्या मित्रांसह दरीत शोध घेतला मात्र त्यांना ट्रक चालक सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला पकडून आणल्याने सर्वानीच सुटकेचा निःश्वास टाकला. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply