Tuesday , March 28 2023
Breaking News

सीकेटी महाविद्यालयाने घडविले ‘श्रमसंस्का

नेरे शांतीवनमध्ये सात दिवस विशेष निवासी शिबिर र’
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे चांगू काना ठाकूर (सीकेटी)आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, न्यु पनवेल (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन, नेरे, तालुका पनवेल याठिकाणी सात दिवसीय विशेष रहिवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले.शनिवारी (दि. 28 जानेवारी) शिबिराच्या उद्घाटनला सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेशकुमार मेंगाडे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहिली. या वेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या समाजकेंद्री उपक्रमांचा मागोवा घेतला. यानंतर प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील विशेष रहिवासी शिबिराचे महत्त्व विषद केले. मेंगाडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना विद्यार्थीदशेत अध्ययनाचे महत्त्व विषद करत. विद्यार्थ्यांनी नेहमीच अभ्यास करत, वाचन करून विश्लेषणात्मक दृष्टीकोन विकसित करण्यावर भर देण्याबाबत सांगितले. अध्यक्षीय भाषणात अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या अंगी असणार्‍या कला गुणांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत सांगितले. आभार आर.टी.सी.सी.एस. महाविद्यालयाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रथमेश ठाकूर यांनी मानले तर सूत्रसंचालन सीकेटी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील यांनी केले.
या वेळी व्यासपीठावर कुष्टरोग निवारण समितीचे चेअरमन प्रमोद ठाकूर, विश्वस्त मोतीलाल बांठिया (माजी नगराध्यक्ष, पनवेल नगर परिषद), राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या रायगड उत्तर विभागाचे समन्वयक डॉ. बबन जाधव, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, खारघरचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, सीकेटी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर स्वयंसेवकांचे विविध संघांमध्ये विभाजन करण्यात आले व प्रत्येक संघासाठी एक स्वयंसेवक आणि एक स्वयंसेवीकेची संघनायक म्हणून नियुक्ती
करण्यात आली. रविवार (दि. 29 जानेवारी)पासून शिबिरास नियमितपणे सुरुवात झाली, दिवसाची सुरवात योगासने व ध्यानसाधनेने झाली. अल्पोपहार झाल्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी श्रमदान केले. सकाळी शिबिराचे पाहिले बौद्धिक सत्र के. पी. इंडस्ट्रीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा राजगुरू यांनी उद्योजकता व महिला सक्षमीकरण विषयावर सत्र घेतले. सायंकाळी व्यक्तिमत्व विकास: काळाची गरज या विषयावर नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लाटे यांनी मार्गदर्शन केले. बौद्धिक सत्रानंतर स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सोमवारी (दि. 30 जानेवारी) सायंकाळी उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी स्पर्धा परीक्षा: संधी आणि आव्हाने यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. मंगळवारी (दि. 31 जानेवारी) स्वयंसेवकांचा संघ नेरे ग्रामपंचायत परिक्षेत्रात स्वच्छता रॅली आणि नेरे परिसरात स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या राबविली. याबरोबर सायंकाळी प्रसिद्ध सिने समीक्षक व दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे यांनी कुटुंबाचे महत्त्व आणि आजचा युवक याविषयावर भाष्य केले.
बुधवारी (दि.1 फेब्रुवारी) सायंकाळी प्रख्यात कर्करोगतज्ञ डॉ.सलील पाटकर यांनी आजचा तरुण आणि आरोग्य याविषयावर संवाद साधत कर्करोगाविषयी स्वयंसेवकांमध्ये जागरूकता निर्माण केली. गुरुवारी (दि. 2 फेब्रुवारी) सकाळी प्रसिद्ध हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी युवकांसमोरील आव्हाने:यशस्वी जीवनाचे मार्ग व प्रा. जगदीश संसारे यांनी पथनाट्यातून सामाजिक जनजागृती या विषयवार स्वयंसेवकांशी संवाद साधला. बौद्धिक सत्रानंतर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी स्वयंसेवकांशी मुक्तसंवाद साधत त्यांच्या माध्यमातून शिबिराचा आढावा घेतला.शुक्रवारी (दि. 3 फेब्रुवारी) शिबिराचा समारोप समारंभ पद्मश्री राहीबाई पोपेरे, बीजमाता (सीडमदर) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. समारोप समारंभात प्रा. सुर्यकांत परकाळे यांनी उपस्थितांसमोर सात दिवसांचा आढावा घेतला. पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी उपस्थितांना संबोधित करताना व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची निर्णायक भूमिका अधोरेखित केली.
समारोप समारंभाच्या मुख्य अतिथी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी स्वयंसेवकांना सेंद्रिय बीजांचा वापर करून आरोग्यकेंद्रित शेतीस प्राध्यान्य देण्याबाबत भाष्य केले. ज्याच्यात चमक असते त्यात धमक असेलच असे नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीने परिश्रम करत चिकाटीने आपले ध्येय गाठणे आवश्यक आहे. याबरोबर शारीरिक कष्ट हे निरोगी आरोग्याचे द्योतक असल्याचे
प्रतिपादन केले. प्रस्तुत शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. अपूर्वा ढगे, कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील, प्रा. अभिजित हिरे, प्रा. कीर्ती वर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले. आझादी का अमृतमहोत्सवी व महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवीवर्षाच्या निमित्ताने आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कौतुक केले.

उल्लेखनीय कामगिरीसाठी स्वयंसेवकांना पुरस्कार
सात दिवसीय विशेष रहिवासी शिबिरात विशेष कामगिरी बजावणार्‍या स्वयंसेवकांना प्रदान करण्यात येणार्‍या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून जीवन भरांबे आणि नेहा म्हात्रे तथा सर्वोत्कृष्ट नेतृत्व म्हणून आशिष चोपडा आणि निशा जांगीड व प्रिया चौधरी यांची नावे कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील यांनी जाहीर केली. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याबरोबर शिबिराच्या यशस्वी आयोजना करिता महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल डॉ. विनोद नाईक (शारीरिक संचालक) यांचा गौरव केला याबरोबर शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गात रोशन रोडपालकर, मिलिंद पाटील, शशिकांत घनसोळकर, स्वप्नील लिंगायत, आतिश भोईर, प्रल्हाद ठाकूर यांचा सत्कार केला. कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन नेरे चे कार्याध्यक्ष श्री. प्रमोद ठाकूर, प्रमुख कार्यवाहक विनायक शिंदे, कार्यवाहक नीलकंठ कोळी आदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आभार प्रा. प्रथमेश ठाकूर यांनी मानून कार्यक्रमाची अधिकृतपणे सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील यांनी केले.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply