श्रीवर्धन ः प्रतिनिधी
श्रीवर्धन आगाराची एसटी बस सोमवारी (दि. 16) सकाळी साखरोणे फाटा येथे रस्त्यावर उलटली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत.
श्रीवर्धन आगाराची नियमित फेरी असणारी बागमांडला ते श्रीवर्धन ही एसटी बस (एमएच 14-बीटी 2738) बागमांडला येथून मार्गस्थ होऊन कोलमांडला, धारीवलीमार्गे श्रीवर्धन येथे येत होती. साखरोणे फाटा येथील तीव्र उतारावर खड्डे चुकवताना गाडीचा ब्रेक न लागल्यामुळे चालकाने गाडी डोंगराच्या दिशेने वळवली असता ती उलटून अपघात झाला. या बसमध्ये एकूण 19 प्रवासी होते. त्यातील 14 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
बसचालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार चालकाने बस डोंगराच्या दिशेने न वळवता उजव्या बाजूला वळली असती, तर 60 फुट खोल दरीत गाडी कोसळून भीषण अपघात झाला असता. त्याचप्रमाणे प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमी प्रवाशांना वेळेत योग्य उपचार मिळाले.
Check Also
माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात …
RamPrahar – The Panvel Daily Paper