नागपूर : प्रतिनिधी
गोंदियावरून पुण्याला निघालेल्या एका तरुणीवर खासगी बसच्या क्लिनरने धावत्या बसमध्ये बलात्कार केल्याची खळबळजनक घटना वाशिमजवळच्या मालेगावनजीक घडली. पीडित तरुणीने पुणे पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून, पोलिसांनी प्रकरण मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे तपासासाठी मालेगाव पोलिसांकडे पाठविले आहे. मालेगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, 5 जानेवारीला ही तरुणी गोंदियाहून पुण्यासाठी खासगी बसने निघाली. बराच वेळ तिला बसायला सीट मिळाली नाही. मालेगावजवळ बस आल्यानंतर तिने कंडक्टरकडे सीट मागितली. कंडक्टरने तिला सर्वांत शेवटची सीट दिली, मात्र बस सुरू झाल्यावर कंडक्टरने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर दोनदा बलात्कार केला. पुण्यात उतरल्यानंतर या तरुणीने आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलावून सर्व घटना सांगितली. त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले, मात्र हा गुन्हा मालेगावच्या हद्दीत असल्याने तो मालेगाव पोलिसांकडे पाठवण्यात आला. या प्रकरणी मालेगाव पोलीस समीर नामक आरोपीचा शोध घेत आहेत.
राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. महाविकास आघाडी अशा घटनांना पायबंद घालण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …