Breaking News

चेतेश्वर पुजारा बनला सहा हजारी मनसबदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटीत सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. अशी कामगिरी करणारा पुजारा भारताचा 11वा फलंदाज ठरला आहे.
तिसर्‍या कसोटीच्या पाचव्या दिवशी नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेत पुजाराने सहा हजार धावा पूर्ण केल्या. सिडनी कसोटीत पुजाराने निर्णायक क्षणी 77 धावांची खेळी केली. हा पुजाराच्या कारकिर्दीतील 80वा सामना होता. पुजाराने 134 डावांत 48च्या सरासरीने सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. यादरम्यान त्याने 18 शतके आणि 27 अर्धशतके झळकावली असून, 206 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
याआधी भारताच्या 10 फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply