Breaking News

वाजेकरशेठ उरणकरांच्या गळ्यातील ताईत

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन, फुंडे कॉलेजमध्ये तु. ह. वाजेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पारितोषिक वितरण

उरण : वार्ताहर

तुकाराम हरी वाजेकर यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उरणचा नावलौकिक सतत उंचावला ते वाजेकरशेठ उरणकरांच्या गळ्यातील ताईत आहेत असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात तु. ह. वाजेकर पुण्यतिथी व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. या समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला विकास समिती सदस्या भावना घाणेकर, चेअरमन कृष्णाजी कडू, सदस्य उमेश म्हात्रे, महालण विभागातील सरपंच, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.  या कार्यक्रमात शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात ज्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली त्या सर्व विद्यार्थ्यांचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी मुंबई विद्यापीठाचा बेस्ट कॉलेज अवॉर्ड महाविद्यालयाला मिळवून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे यांचे कौतुकही रामशेठ ठाकूर यांनी केले. महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापकांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे यांनी केले. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाचा अहवाल प्रा. दिलीप केंगार यांनी सादर केला. जिमखाना अहवाल प्रा. डॉ. विलास महाले यांनी तर सांस्कृतिक अहवाल डॉ. रमेश म्हात्रे यांनी सादर केला. कार्यक्रमाला प्राचार्य मोहन पाटील, रमाकांत म्हात्रे, यशवंत ठाकुर, अशोक कडु, शरद म्हात्रे, सतिश वाजेकर, केशव कडु, दर्शन घरत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. ए. यु. सरवदे यांनी तर आभार प्रा. यु. टी. घोरपडे यांनी मानले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply