कर्जत : रामप्रहर वृत्त
अनलॉक होताच मुंबई आणि परिसरातील नागरिकांनी वन डे ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या मिनीट्रेनमधून फिरण्यास सर्वांनी पसंती दर्शविली आहे. यातून मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 33 लाख 61 हजारांची भर पडली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये अनेक महिने घरात राहावे लागल्यामुळे सर्वांनाच बाहेर फिरण्याचे वेध लागले होते. त्यामुळे अनलॉक होताच मुंबई आणि परिसरातील नागरिकांनी वन डे ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मिनीट्रेन बंद होती. नोव्हेंबरपासून माथेरान स्टेशन ते अमन लॉजपर्यंत मिनीट्रेनची शटल सेवा सुरू झाली आहे. सुरुवातीला शटल सेवेच्या दिवसाला चार फेर्या सुरू होत्या, मात्र प्रवाशांचा प्रतिसाद पाहून दिवाळीनंतर शटल सेवेच्या दिवसाला 12 फेर्या सुरू करण्यात आल्या. पर्यटकांनी माथेरान ते अमन लॉज या मिनीट्रेनमधून फिरण्यास पसंती दिल्याने मध्य रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणिय भर पडली आहे.
जानेवारीत पाच लाखांची भर
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 7,557 पर्यटकांनी प्रवास केला. त्यातून मरेच्या तिजोरीत 4,91,298 रुपयांची भर पडली.
महिना प्रवासी संख्या मिळालेले उत्पन्न
नोव्हेंबर 16,946 11,38,157 रुपये
डिसेंबर 28,186 17,31,567 रुपये
एकूण 45,132 28,69,724 रुपये