Breaking News

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; बसपचे कार्यकर्ते भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त

लोकहिताच्या विविध योजना अमलात आणून सर्वसामान्य माणसाचा आत्मसन्मान वाढेल अशी कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्याच टर्ममध्ये केली. त्या अनुषंगाने आपल्या देशात विकासाची घोडदौड जोरात सुरू आहे. याच बळावर लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांना निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 4) येथे व्यक्त केला.

खालापूर तालुक्यातील तुपगाव व खोपोली येथील बहुजन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणाने आपला देश प्रगती करीत आहे, असे त्यांनी सांगितले, तसेच ‘फिर से मोदी सरकार’ असा नाराही दिला.

पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोळंकी, अनुसूचित जाती मोर्चाच्या खोपोली शहर अध्यक्षा शोभा काटे, उपाध्यक्षा गीता मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी अनुसूचित जाती मोर्चाच्या खोपोली शहर अध्यक्षा शोभा काटे यांच्या माध्यमातून व किशोर मोरे यांच्या नेतृत्वाखाली तुपगाव (चौक) येथील किसन मोरे, बेबी मोरे, दर्शना मोरे, अल्पेश गायकवाड, अनिकेत गायकवाड, हृतिकेश गायकवाड, सुकेनशी गायकवाड, तसेच खोपोली येथील योगेश कांबळे, शोभा भांडीलकर, वनिता म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपत प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उपस्थित अन्य मान्यवरांनी पक्षात स्वागत केले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply