Breaking News

रायगडात तीन तटकरे, दोन गीते उमेदवार

एकूण 26 अर्ज दाखल; आज छाननी

अलिबाग : प्रतिनिधी

मुख्य उमेदवाराचे साधर्म्य असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची परंपरा रायगडला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ती जपली गेली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, त्यात दोन अनंत गीत; तर तीन सुनील तटकरे नावाच्या उमेदवारांचा समावेश आहे. शुक्रवारी अर्जांची छाननी होणार आहे.

शिवसेनेचे अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेला अनंत पद्मा गीते नावाचा आणखी एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे; तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याही नावाशी साधर्म्य असलेले सुनील पांडुरंग तटकरे व सुनील सखाराम तटकरे असे दोन अर्ज दाखल झाले आहेत. 2014 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही सुनील तटकरे या नावाच्या दुसर्‍या उमेदवाराने सुमारे 10 हजार मते मिळवली होती.

रायगड लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी (दि. 4) उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 14 जणांनी आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे आता एकूण अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या 26 इतकी झाली आहे. गुरुवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये सुनील सखाराम तटकरे (अपक्ष), सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), संजय अर्जुन घाग (अपक्ष), विलास गजानन सावंत (महाराष्ट्र क्रांती सेना), सचिन भास्कर कोळी, (वंचित बहुजन आघाडी), गजेंद्र परशुराम तुरबाडकर, (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके, (भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील, (अपक्ष), रामदास दामोदर कदम (अपक्ष), सुनील पांडुरंग तटकरे (अपक्ष), अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष), योगेश दीपक कदम (अपक्ष), गायकवाड अनिल बबन (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) यांचा समावेश आहे; तर अनंत गंगाराम गीते (शिवसेना) यांच्या वतीने सुचकांनी आणखी दोन अर्ज भरले. सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी) यांनीही आणखी एक अर्ज भरला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply