Breaking News

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुरेश पाटील

उरण : वार्ताहर

भारतीय फोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाची (बीएमएस) राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबई येथे दि. 10 व 11 जानेवारीला देशातील सर्व बंदरातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत सुरेश पाटील यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी एकमुखाने निवड करण्यात आली.

देशातील सर्व उद्योगक्षेत्रातील एक नंबरची असलेली कामगार संघटना भारतात अत्यंत प्रभावीपणे कार्य करत आहे. या बैठकीत देशातील कामगारांच्या अनेक समस्या विषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आवाज उठवण्याचे काम सर्व बंदरात करण्यात आला. या बैठकीला महासंघाचे (बीएमएस) राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅण्ड भवानी शंकर, उपाध्यक्ष जगदीश राव, केंद्रीय नेते उद्योग प्रभारी अण्णाधुमाळ, महासंघाचे प्रभाकर उपरकर, व्यकंपा नाईक, जेएनपीटीचे माजी विश्वस्त रवी पाटील, कामगार नेते सुधीर घरत सर्व बंदरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply