Breaking News

भामट्याला बेड्या

सहा लाख 51 हजारांची फसवणूक

उरण ः प्रतिनिधी

एका गार्डची एजन्सी आणि नोकरी देण्याच्या बहाण्याने 6 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या किरण दीपक महाडिक या भामट्याला उरण पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला उरणच्या न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार एका खासदाराशी जवळीक असल्याचे सांगून तुमचे काम करून देतो, अशी बतावणी करणार्‍या किरण दीपक महाडिक या इसमाने फिर्यादी महेश प्रल्हाद शेटे यांना गार्डची एजन्सी व नोकरी देण्याच्या बहाण्याने सुमारे 6 लाख 51 हजार उकळून वरील आरोपी इसम पसार झाला होता. त्याचप्रमाणे नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या दरम्यान चिंतामणी सोसायटी, मानेवाडी कामठा, उरण येथील नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवूनही फसवणूक केली होती. महेश शेटे यांनी एप्रिल 2019मध्ये उरण पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याबाबतची तक्रार केली होती. त्यानुसार उरण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी किरण महाडिक याला मोठ्या शिताफीने कामोठे येथून ताब्यात घेऊन अटक केली. उरणच्या कनिष्ठस्तर न्यायालयासमोर हजर केले असता 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  पोलीस उपनिरीक्षक विकास गायकवाड तपास करीत आहेत.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply