नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेन येथे चौथा व निर्णायक कसोटी सामना होणार आहे. हा सामना जिंकून चषकावर कब्जा करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील, मात्र भारतीय संघ दुखापतींमुळे बेजार आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याच्या बातम्या समोर येताहेत. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने यावर एक मजेशीर ट्विट केले. यात त्याने चौथ्या कसोटीत खेळण्याची तयारी दर्शवत बीसीसीआयला तशी ऑफर दिली आहे. त्याने दुखापतग्रस्त खेळाडूंचा फोटो पोस्ट करून ट्विट केले, ‘इतके खेळाडू दुखापतग्रस्त झालेत. जर 11 जणांची भरती होत नसेल तर ऑस्ट्रेलियाला जायला तयार आहे. बीसीसीआयने विलगीकरणाचे पाहावे.’ सेहवागचा हा अंदाज अनेकांना आवडला आहे.