Breaking News

रायझिंग डे अंतर्गत कामोठे पोलिसांकडून उपक्रम

पनवेल : वार्ताहर

रायझिंग डे अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी कामोठे वसाहतीमधील ज्येष्ठ नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना कोविडसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच बदलापूर येथील एका अंध व्यक्तींच्या संस्थेला रोख रकमेची मदत केली.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सर्व पोलीस ठाण्यांत रायझिंग डे उपक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील व त्यांच्या इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी या वेळी विभागातील ज्येष्ठ नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून त्यांना विविध समस्यांसंदर्भात मार्गदर्शन केले. कोरोनासंदर्भात मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे या सूचना केल्या. त्याचप्रमाणे बदलापूर येथील एका अंध व्यक्तींच्या संस्थेला रोख रकमेची मदत या वेळी करण्यात आली.

आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सूचनेनुसार त्यांचा यथोचित सत्कार व वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

-संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply