आमदार महेश बालदी यांची ग्वाही
उरण : वार्ताहर
करंजा गावामध्ये भाजपतर्फे अनेक विकासकामे केली जातील. तसेच येथील पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही आमदार महेश बालदी यांनी दिली. ते ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त करंजा येथे मंगळवारी (दि. 12) प्रचारसभेत बोलत होते.
आमदार महेश बालदी म्हणाले की, करंजा बंदरासाठी दीडशे कोटींचा निधी आणला, जेणेकरून येथील कोळी बांधवांना रोजगार मिळेल. येथील पाण्याचा प्रश्न मोठा आहे. करंजा ग्रामपंचायत ही शिवसेनेकडे आहे, परंतु त्यांनी कधी पाण्याच्या समस्या सोडविण्याचा विचार केला नाही. येथील नागरिकांना 15 दिवसांतून एकदाच पिण्याचे पाणी येते. त्यामुळे येथील पाण्याचा प्रश्न लवकरच सोडविला जाईल. येथील नागरिकांना रोज पाणी मिळेल अशा प्रकारे आमचे प्रयत्न राहतील. घारापुरी बेटावर 70 वर्षे लाइट नव्हती ती आणली. उरण शहराला पाइपद्वारे गॅस आणला. सुमारे दोन हजार नागरिक याचा उपभोग घेत आहेत. आपला भाजपचा झेंडा चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीवर फडकणार हे निश्चित आहे.
या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका युवा अध्यक्ष शेखर म्हात्रे, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, चंद्रकांत घरत, नगरसेविका स्नेहल कासारे, सुधीर घरत, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, जिल्हा परिषद सदस्य रिना घरत, कार्यकर्ते हितेश शाह, निलकंठ म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, मकरंद पोतदार, चाणजे ग्रामपंचायत उमेदवार प्रमिला म्हात्रे, रविंद्र कोळी, जागृती कोळी, सागर वाघमारे, अशोक कोळी, सोनाली ठाकूर, हेमांगी भोईर, रुपाली चव्हाण, अजय म्हात्रे, पुष्पा म्हात्रे, दीपिका कोळी, विकास थळी, स्नेहल म्हात्रे, रीना पाटील, प्रदीप नाखवा, चेतन पाटील, पल्लवी ठाकूर, चंद्रकांत घरत, गणेश नाखवा, नारायण नाखवा, शिवदास नाखवा यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, कोळी बांधव, भाजप कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
आमदार महेश बालदी जे बोलतात ते करतात. येथील पाण्याची मुख्य समस्या तसेच विविध समस्या आमदार महेश बालदी निश्चितपणे सोडवतील.–आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष
चाणजे येथील शवसैनिकांचा भाजतप प्रवेश
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चाणजे येथील शिवसेनेचे प्रितम पाटील, हरिश्चंद्र पाटील, हरिष पाटील, भावेश म्हात्रे, गणेश म्हात्रे, सर्वेश म्हात्रे, रोहीत म्हात्रे, रुतिक म्हात्रे, वैभव म्हात्रे, पवन म्हात्रे, मयुरेश पाटील, धिरज म्हात्रे, विनय म्हात्रे, मोरश्वर कोळी, तृप्ती कोळी, विष्णू कोळी, दिपक कोळी, किरण कोळी, रोशन कोळी, हरिश्चंद्र कोळी, संदीप कोळी, संतोष कोळी, नंदा कोळी, प्रेमा कोळी, प्रगती कोळी, अश्विन कोळी, रेश्मा कोळी, उरर्मीला कोळी, हर्षदा कोळी, रुपदा कोळी, तेजस्वी कोळी आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.