बाळासाहेब पाटील, विक्रांत पाटील यांची सदिच्छा भेट
पनवेल : वार्ताहर
पनवेल येथील डॉ. पटवर्धन रुग्णालयाच्या माध्यमातून नवीन अद्ययावत अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या वेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी भेट देत रुग्णालयाच्या सर्व सेवा-सुविधांची पाहणी केली.
पनवेल येथील डॉ. पटवर्धन रुग्णालय हे जनसेवेसाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहे. नागरिकांना अल्पदरात वैद्यकीय सेवा देणे आणि त्यांना इतर वैद्यकीय सुविधा पुरवणे यासाठी डॉ. पटवर्धन रुग्णालय यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. डॉ. पटवर्धन रुग्णालयाच्या माध्यमातून नवीन अद्ययावत अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. त्या माध्यमातून आता मोठ्या शस्त्रक्रियासुद्धा या ठिकाणी करता येणार आहेत.
उपक्रमाला कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील व भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी उद्घाटनाच्या वेळी भेट दिली व रुग्णालयाच्या सर्व सेवासुविधांची पाहणी केली. जनसामान्यांच्या हक्काचे डॉ. पटवर्धन रुग्णालय जलद गतीने स्तुत्य वाटचाल करत असल्याबद्दल बाळासाहेब पाटील व विक्रांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच रुग्णालय व्यवस्थापन समितीचे आभार मानले. या वेळी अनुराधा ओगले, राजीव समेळ आणि सुनील लघाटे उपस्थित होते.