Breaking News

जुई गावात ‘दिबां’ची जयंती

पनवेल : रामप्रहर वृत्त

जुई (कामोठे) गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणि एकता ग्रुप मित्र मंडळ यांच्या वतीने परिराणी कार वॉशिंग सेंटर जुई येथे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते करण्यात आले व दीपप्रज्वलन नगरसेवक विकास घरत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित मा. सरपंच भाऊशेठ भगत,  जुई गावातील ग्रामस्थ व पंचकमिटी, रिक्षा संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि एकता ग्रुप मित्र मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply