Breaking News

कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने पतसंस्था अडचणीत येतात -शिरीष देशपांडे

अलिबाग : प्रतिनिधी

कर्मचारी प्रशिक्षित असले की ते संचालक मंडळांना त्यांच्या चुका दाखविण्याचे धाडस करू शकतात. त्यामुळे पुढील अडचणी टळू शकतात. कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने  पतसंस्था अडचणीत येतात, असे मत बुलढाणा अर्बन क्रे्रडिट सोसायटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी येथे व्यक्त केले.

येथील कमळ नागरी पतसंस्थेच्या संवाद सहकाराचा  या पुस्तकाचे प्रकाशन शिरीश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कमळ नागरी पतसंस्थेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभास पुस्तकाचे लेखक गणेश निमकर व प्रदीप जोशी, कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सतीशचंद्र पाटील, संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे उपस्थित होते.

संवाद सहकाराचे हे पुस्तक सहकरी पतसंस्थांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना तसेच संचालकांना उपयुक्त आहे. प्रत्येक पतसंस्थेत हे पुस्तक असायला हवे.  ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी काय करायला हवे, पतसंस्थेचा कारभार पारदर्शकपणे कसा चालवावा याची माहिती संवाद सहकाराचा या पुस्तकांतील लेखांमधून मिळेल, असे  देशपांडे म्हणाले.

पतसंस्थेत ठेवी किती आहेत,  कर्ज किती दिली आहेत. याच्याशी ग्राहाकांचा काही संबंध नसतो. तुमचे आकडे किती मोठे आहेत ते ग्राहक पहात नाहीत. पतसंस्थेचा कारभार कसा चालतो हे पाहिले जाते. पतसंस्थांचा कारभार पारदर्शक असला तरच ग्राहक विश्वासाने आपला पैसा पतसंस्थांमध्ये ठेवू शकतात, असे मत  देशपांडे यांनी व्यक्त केले. लेखक गणेश निमकर व प्रदीप जोशी यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. सतीशचंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. गिरीश तुळपुळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आनंद करंबत यांनी आभार मानले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply