पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकार्यांना पदमुक्त करण्याच्या सूचना केल्यानंतर ही बदली करण्यात आली आहे.
आयुक्त देशमुख यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार आणि मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांना तत्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले असल्याने त्यांनी बुधवारी सकाळी आपला पदभार अतिरिक्त आयुक्तांकडे सुपूर्द केला. दरम्यान, नवीन आयुक्तांची नेमणूक अद्याप झाली नसल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper