Breaking News

रस्ता सुरक्षा अभियानाचे आज अलिबागेत उद्घाटन

अलिबाग ः प्रतिनिधी

पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रायगड जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात 32व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी निधी चौधरी, तर प्रमुख उपस्थिती जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांची असणार आहे. 32वे रस्ता सुरक्षा अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत राबविले जाणार असून, सडक सुरक्षा-जीवन रक्षा हे याचे घोषवाक्य आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांविषयी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार व जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी केले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply