Breaking News

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. संपकरी कर्मचार्‍यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत चर्चा झाली असून ती यशस्वी झाल्याचे संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आलेे.
या संदर्भात माहिती देताना संपकरी कर्मचार्‍यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांबरोबर आज सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा यशस्वी झाली. आमची मूळ मागणी सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करा अशी होती. याबाबत सरकार गंभीर विचार करीत असून सरकारने समिती नेमली आहे. त्यामुळे आम्ही आमचा संप मागे घेत आहोत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply