प्रा. सुधीर पुराणिक यांच्या पुढाकाराने एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे अभियान
पाली : प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व पाली (ता. सुधागड) येथील जे. एन. पालिवाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुधीर पुराणिक यांच्या पुढाकाराने कोरोना काळात तब्बल 10 हजार रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे.
कोरोना संकटकाळात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रा. सुधीर पुराणिक यांच्या पुढाकाराने मुंबई विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांमार्फत अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून या रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत. या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. सुधीर पुराणिक यांचे आणि रक्तदानाच्या या अभियानात महत्वाची भूमिका बजवाणार्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.