Breaking News

महायुतीच्या सभांचा आज पेणमध्ये धडाका

पेण : प्रतिनिधी : शिवसेना, भाजप, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. 1) पेण तालुक्यात ठिकठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभांना उमेदवार ना. अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रवीशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, संपर्कप्रमुख विलास चावरी, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, भाजप लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, प्रवक्ते मिलिंद पाटील, विधानसभा समन्वयक श्री. गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.

सोमवारी सकाळी पहिली सभा 10.30 वाजता बापूजी मंदिर मैदान सावरसई, दुपारी 12.30 वाजता केळंबादेवी मंदिर पायथा-खरोशी, 3 वाजता कळवे एसटी स्टँडसमोर, सायंकाळी 5 वाजता वडखळ येथील साई आशीर्वाद हॉटेलशेजारी आणि रात्री 7 वाजता वढाव येथील शिवनेरी मैदानात होणार आहे. या सभांना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे आणि भाजप तालुकाप्रमुख गंगाधर पाटील यांनी संयुक्तपणे केले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply