Breaking News

शेकाप, शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी व इतर मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण विधानसभा
मतदारसंघातील गव्हाण जिल्हा परिषद तसेच पोयंजे पंचायत समिती गणातील शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेतील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 14) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी व इतर मान्यवरांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. पनवेल आणि उरण मतदारसंघांमध्ये दोन्ही आमदार विकासाच्या दृष्टीने भरीव काम करत आहेत. त्यामुळे या परिसरात भाजप हा प्रमुख पक्ष बनला आहे. येणार्‍या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. महायुती म्हणून आपण एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ तसेच नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान दिला जाईल.
आमदार महेश बालदी यांनी मनोगतात उलवे शहराच्या भविष्यासंदर्भात भूमिका मांडली. उलवे हे 21व्या शतकातील महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर आहे. येथे जर कुणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती दहशत संपवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. कमिशनखोरी व पाकीटमार प्रवृत्तीला येथे थारा दिला जाणार नाही. हे शहर भयमुक्त, सुरक्षित आणि विकासाभिमुख करण्यासाठी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करू, असा निर्धार त्यांनी
व्यक्त केला.
भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांनी म्हटले की, मी सहा-आठ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. येथे जुना-नवीन असा कोणताही भेदभाव नाही. मला आणि माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना योग्य तो मान मिळतो आहे. तुम्हालाही तोच मान मिळेल. येणार्‍या गव्हाण जिल्हा परिषद निवडणुकीत आता महायुतीशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात शेकापचे नेते संजय नाईक, भानूदास कडू, वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद कडू, मोरावे गावचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, कांती मामा, शिवसेना शिंदे गटाचे नेते कुलदीप तिवारी, पोयंजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रवीण भोईर, शिवसेना उबाठा गटाचे रमेश भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमास भाजपचे रविशेठ पाटील, जितेंद्र म्हात्रे, विजय घरत, विठ्ठलशेठ ओवळेकर, उत्तम कोळी, मदन पाटील, अविनाश गाताडे, निलेश खारकर, सचिन घरत, वितेश म्हात्रे, धीरज ओवळेकर, योगिता भगत, निकिता खारकर, यादवशेठ घरत, रामदास नाईक, मंगेश लबडे, प्रभूदास भोईर, संजय घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे गव्हाण जिल्हा परिषद व पोयंजे पंचायत समिती क्षेत्रात भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून येणार्‍या निवडणुकांमध्ये महायुतीला याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply