Breaking News

पोलिसांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – बद्री केदार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि कळंबोली भाजप मंडळ उपाध्यक्ष दिलीप बिष्ट यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाण्यात सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. या वेळी पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड उपस्थित होते.

या वेळी दिलीप बिष्ट यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटात पोलीस दल फ्रंट लाईन वॉरियर्स म्हणून काम करत आहेत. त्यांना छोटीसी मदत व कर्तव्य म्हणून सॅनिटायझर, मास्कचे  वाटप केले.

या कार्यक्रमास स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या संस्थापक विजया कदम, कळंबोली मंडळ उपाध्यक्ष संदीप भगत, उमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply