नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ घाटात खडकीजवळ मजुरांना घेऊन जाणारी जीप शनिवारी (दि. 23) सकाळी खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला असून, 25हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात इतका भयंकर होता की जीपचा फक्त सांगडाच उरला आहे. दरीत ठिकठिकाणी मजुरांचे मृतदेह पडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य कर्मचार्यांसह स्थानिक गावकर्यांनी धाव घेतली. जखमींना तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Check Also
कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …
RamPrahar – The Panvel Daily Paper