Breaking News

बाळासाहेबांना फडणवीसांची मानवंदना; शिवसेनेला चिमटे

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मानवंदना दिली. यानिमित्ताने त्यांनी बाळासाहेबांचे नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वावरून शिवसेनेला चिमटे काढले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे कौतुक केले आहे. बाळासाहेबांचे चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्वाचे मूर्तिमंत प्रतीक असे वर्णन करण्यात आले आहे तसेच बाळासाहेबांच्या भाषणातील निवडक आणि सूचक वाक्ये फडणवीसांनी व्हिडिओतून शेअर केली आहेत.
आम्ही कुठेही असलो तरी बाळासाहेब ठाकरे आम्हाला आदरस्थानीच राहतील. त्यांच्या विचारांसाठी संघर्ष करीत राहणार. तुम्ही त्यांच्या विचारांत मिसळ केली असेल, आम्ही नाही केली. बाळासाहेब हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींकडूनही अभिवादन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. बाळासाहेब आपल्या आदर्शांप्रती सदैव ठाम राहत असत, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply