Breaking News

पनवेलमध्ये ई स्टोअरचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल शहरातील वेदीक आयुक्योरच्या पहील्या ई स्टोअर इंडिया सुपर बाजाराचा शुभारंभ वेदीक आयुक्योरचे नॅशनल प्रमोटर अनिल जाधव यांच्या हस्ते झाला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभली.

पनवेल शहरातील साई सारंग को.ऑप.हौ. सोसायटी, मोमिनपाडा, शनिमंदिररोड, टपालनाका, ओल्ड पनवेल या ठिकाणी या ठिकाणच्या ई स्टोर इंडिया सुपर बाजाराचा शुभारंभ रविवारी (दि. 24) झाला.

सर्वांना सवलतीच्या दरात जीवनावश्यक साहित्य उपलब्ध व्हावे या करीता कंपनीने या ई स्टोर इंडिया सर्वांत स्वस्त सुपर बाजाराची निर्मिती केली आहे. याचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन अनिल जाधव यांनी या वेळी केले. तसेच संजना परापंजे यांनी सांगितले की, वेदीक आयुक्योरचे मंदिर निर्माण करण्यासाठी खुप जणांनी परिश्रम घेतले आहे. आयुवेदीक शिबिराचा लाभ घ्या, निरोगी रहा असे आवाहन केले. तर मनोज घोसाळकर यांनी सांगितले की, या वेदीक आयुक्योर कंपनीने सर्वांना रोजगार देण्याचे कार्य केले हे खुप मोठे कार्य आहे. सामाजिक कार्यकर्त्या रेणुका पन्हाळे म्हणाल्या की, या ठिकाणी प्रत्येक महिन्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत तसेच सवलतीच्या दरात जीवनावश्यक साहित्य मिळणार आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा.

या वेळी वेदीक आयुक्योरच्या साऊथ इंडिया प्रमोटर संजना परापंजे, शुभलक्ष्मी जाधव, वेदीक आयुक्योरचे आयुक्योर मुंबईचे ग्रेट लिडर रघुनाथ धनावडे, सुरेश कावळे, कराड येथील विजय पाटील, रोहा टाइम्सचे संपादक मनोज घोसाळकर, डॉ. पवार, शॉपी ओनर व सामाजिक कार्यकर्त्या रेणुका पन्हाळे (डेवल्पमेंट ऑफीसर), सावित्रीबाई फुले पतसंस्थेचे चेअरमन बी. पी. म्हात्रे, कर्नाळा स्पोर्टस अकॅडमीचे सचिव सूर्यकांत ठाकूर, स्मिता आशिष म्हात्रे वेदीक आयुक्योरच्या मुंबई इंडियनस् टिमचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply