कर्जत : बातमीदार
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानिवली येथील एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित 17 वर्षीय तरुणीवर कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील मानिवली येथील पीडित तरुणीच्या घरी कोणी नसताना तिच्यावर त्याच गावातील 37 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केला. मागील दीड महिन्यात तीन ते चार वेळा असा प्रकार घडला. सध्या अल्पवयीन मुलगी कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. अत्याचाराबाबत पीडितेने तक्रार दिल्यानंतर तेथून नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला. त्यानुसार नेरळ पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
Check Also
आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …