Breaking News

रोह्यात विविध सामाजिक प्रतिष्ठान, युवकांचा सन्मान

धाटाव ः प्रतिनिधी

डॉ. सी. डी. देशमुख यांच्या पुण्यभूमीत भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय नेहरू युवा केंद्र, रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्यासाठी रोह्यातील विविध प्रतिष्ठान व युवकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचा अलिबाग येथे रायगड जिल्हा  प्रभाकर पाटील सभागृहात कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील असंख्य युवकांचा सन्मान करताना विशेषतः रोहा तालुक्यातील सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचा केलेला गौरव आम्हाला प्रोत्साहन देणारा होता. भविष्यात हा सन्मान नवीन कार्य करण्यास ऊर्जा देईल व प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर व त्यांच्या सहकार्‍यांनी व्यक्त केली. प्रमुख उपस्थित रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व प्रल्हाद सोनुने (राज्य संचालक महाराष्ट्र व गोवा राज्य), नितीश रौतेला, सुशील सायकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या वेळी सुराज्यचे अध्यक्ष रोशन चाफेकर, हाजीमलंग कोठारी, मयूर धनावडे, विनीत वाकडे, अनय बारस्कर, वेदांत देशमुख, अभिजित भोसले, तुषार दिघे, संकेत देसाई, मोनिष भगत, सुमित खरात, सुमित कडू, अथर्व लोहाट, रोहन दांडेक, विनीत वाकडे, राहुल पोकळे व कोरोना काळात माणुसकी दाखवून अप्रतिम कार्य करणारे रोह्यातील आदित्य कोंडाळकर, राजेश काफरे यांचाही सन्मान करण्यात आला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply