उरण : वार्ताहर
उरण नगरपरिषद कार्यालयासमोर नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपरिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून सायकल रॅली, नगरपालिकेचे विमला तलाव येथे वृक्षारोपण व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उरण शहरात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरात स्वच्छते विषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी हरित शपथ दिली व नंतर या रॅलीला उरण नगरपरिषद येथून सुरुवात झाली. रॅलीत भाग घेणार्या प्रत्येकास प्रशस्तीपत्र देण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराक्ष जयेंद्र कोळी, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक कौशिक शाह, रवी भोईर, राजेश ठाकूर, नंदकुमार लांबे, नगरसेविका स्नेहल कासारे, यास्मिन गॅस, जानव्ही पंडीत, संपूर्णा थळी, तसेच संतोष पवार, जगदीश म्हात्रे, मधुकर भोईर, धनुश कासारे, हरेश जाधव, महेंद्र् साळवी, विजय पवार, संतोष ओटावकर, कामगार व कर्मचारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत उरण शहरात स्वच्छतेबद्दल विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रशिस्तीपत्रक देण्यात आले. त्यात पोलीस अधिकारी, वैष्णवी हॉटेल, पालवी हॉस्पिटल, उरण नगरपरिषदेचे कर्मचारी यांचा समावेश होता.