Wednesday , February 8 2023
Breaking News

मेरी कोमचा पराभव

टोकियो ः वृत्तसंस्था

लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या मेरी कोमला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभवाचा धक्का बसला. महिलांच्या 48-51 किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरीचा कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना व्हिक्टोरिया हिने पराभव केला. पहिल्या फेरीत इंग्रीटने आक्रमक खेळ करून 4-1 अशी बाजी मारली. दुसर्‍या फेरीत मेरीकडून पलटवार झाला. मेरीने या फेरीत 3-2 अशी बाजी मारली. तिसर्‍या फेरीत कडवी टक्कर झाली, पण शेवटी इंग्रीटने सरशी साधून लढत आपल्या नावे केली.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply