अलिबाग ः प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त (दि. 26) झुंझार युवक मंडळ पोयनाड यांच्यातर्फे आयोजित क्रिकेट सामन्यात पोयनाड पोलीस संघाने विरुद्ध पोयनाड व्यापारी असोसिएशनच्या संघाचा 25 धावांनी पराभव केला. पोयनाड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल अतिग्रे यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिल कुथे, तर दर्शन जैन यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चषक देऊन गौरविण्यात आले. दोन्ही संघांना सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पोयनाड पोलीस संघाने 8 षटकांमघ्ये 4 गडी गमावून 90 धावा केल्या. पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी 50 धावा केल्या. त्यांनी 6 षटकार आणि एक चौकार मारला. अनिल कुथे आणि नरेश पाटील यांची सांगली साथ मिळाली. व्यापारी संघाकडून दर्शन जैन यांनी अचूक गोलंदाजी करीत दोन बळी मिळवले. 90 धावांना प्रत्युत्तर देताना पोयनाड व्यापारी असोसिशन संघाने 8 षटकांत 6 गडी गमावून 65 धावांपर्यंत मजल मारली. राज जैन यांनी स्वतःची चमक दाखवत सर्वाधिक 20 धावा केल्या.
सामन्यासाठी झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, सेक्रेटरी किशोर तावडे, खजिनदार दीपक साळवी, पोयनाड पोलीस स्टेशनचे पीएसआय उमाजी काळे, जाधव, झुंझार युवक मंडळाचे सदस्य अजय टेमकर, अॅड. पंकज पंडित, पंकज चवरकर, शैलेंद्र गायकवाड, धर्मेश पाटील, पोयनाड ग्रामपंचायतीचे सदस्य किशोर जैन, अजित चवरकर व्यापारी असोसिएशनचे सदस्य संजय जैन, भरत जैन, चांद्रेश जैन, अक्षय अगरवाल, नरेश जैन, कमलेश जैन, सुरेश जैन, अशोक जैन यांच्यासह व्यापारीवर्गाने मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …