Breaking News

राष्ट्रध्वजाचा अपमान करणार्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

भारत रक्षा मंचची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या किसान आंदोलन ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली दिल्लीमध्ये झालेला आंदोलकांचा उद्रेक व त्यानंतर लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकवून राष्ट्रध्वजाचा करण्यात आलेल्या अपमानाबद्दल संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारत रक्षा मंचच्या वतीने शुक्रवारी (दि.29) कोकण आयुक्ताद्वारे केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करण्यात आली आहे.

   महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा बिना गोगरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाच्या नावाखाली पोलीस व सैन्य बळावर हल्ला कारण्यात आला तसेच देशाच्या संपत्तीचेदेखील मोठे नुकसान करण्यात आल्याने हे कृत्य घृणास्पद असल्याने संबंधित आंदोलकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्यादिवशी आतंकवादी संघटनेने हे कृत्य केले असल्याचे सांगत संबधितांवर कठोर कारवाईची गरज असल्याचे सांगत गोगरी यांनी हे निवेदन कोकण आयुक्तांच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना दिले.

या वेळी बिना गोगरी यांच्यासह पंकज तिवारी, मयुरेश शेट्ये, सर्वेश्वर शर्मा, सुभाष सिंह,जयेश गोगरी, अल्पना डे, चित्रा राव, नीता गोगरी आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply