Breaking News

भाजप खारघर कार्यालयास सदिच्छा भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप दक्षिण भारत सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेश पिल्लई, राज्य दक्षिण भारत महिला अध्यक्ष ज्योती अय्यर आणि महाराष्ट्र राज्य दक्षिण भारतातील काही मुख्य सदस्यांनी खारघर येथील भाजप कार्यालयास शुक्रवारी (दि. 29) सदिच्छा भेट दिली.

भाजप खारघर तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत केले. या वेळी राजेश पिल्लई यांनी राज्यातील दक्षिण भारतीय सेलच्या वाटचालीबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तसेच भाजप दक्षिण भारत सेलचे उत्तर रायगड जिल्हा संयोजक श्रीनिवास कोडुरू यांनी रायगड उत्तर जिल्ह्यातील वैशिष्ट्ये आणि जिल्ह्यात अवलंबल्या जाणार्‍या कार्यपद्धतींबद्दल संघाला थोडक्यात माहिती दिली.

या वेळी श्रीधर मड्डी, गोपा कुमार मेनन, राजन पिल्लई, चेतन सुवर्णा, योगराजा नादर, अमरनाथ हॅलेम्बर, थाहिर अली कोलाईल, नील रमेश, श्यामला शेट्टीगर, यमुना प्रकाशन, प्रेमा मेनन, गनेश ए. शेट्टी, ज्योती एन. अय्यर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply