Breaking News

श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील रसायनी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतीय बौध्द महासभा रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्याच्या वतीने मंगळवारी (दि. 26) आयोजित केलेल्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला.  प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक तथा सभापती प्रकाश बिनेदार उपस्थित होते.

या वेळी जगाला शांततेचा संदेश देणार्‍या तथागतांच्या बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार या रायगड जिल्ह्यात अविरतपणे करणार्‍या या भारतीय बौध्द महासभा, रायगड जिल्ह्याचा मी आणि माझे कुटूंबिय आजीव सभासद आहोत. याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रशंसोद्गार सभापती प्रकाश बिनेदार यांनी काढले.

या वेळी प्रमुख मार्गदर्शक भन्ते महेंद्र बोधी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्र मोरे, उपाध्यक्ष स. जा. कवडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रायगड जिल्हाध्यक्ष काशिनाथ कांबळे यांनी भुषविले. प्रस्तावना जिल्हा महासचिव संजय जाधव यांनी केली. सुत्रसंचलन जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हा संस्कार उपाध्यक्ष के. के. गाडे बापू, सचिव प्रकाश गायकवाड, पनवेल तालुकाध्यक्ष सुनील वाघपंजे, महासचिव राहुल गायकवाड यांंनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे

आजी-माजी पदाधिकारी व सभासद उपासक-उपासिका बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply