पनवेल महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांच्या आरोग्याविषयी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महापालिका शाळेतील मुलींना व सफाई कर्मचार्यांकरीता गर्भाशय मुख कॅन्सर लसीकरण शिबिराचे कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी (दि. 30)आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल उपस्थित होत्या. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांच्या अनेक आजारांवर निराकरण करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महिलांना होणार्या गर्भाशय मुख कॅन्सर संदर्भात लसीकरण शिबिराचे आयोजन कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिला व बालकल्याण सभापती कुसूम म्हात्रे, नगरसेविका राजेश्री वावेकर, पुष्पा कुत्तरवडे, डॉ. सुरेखा मोहोकर, सारीका भगत, उपायुक्त जमीर लेंगरेकर, डॉ. रसाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या शिबिरा संदर्भात महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सह आयुक्त तेजस्वीनी गलांडे यांनी अधिक माहिती दिली.