उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात कोविड लसीकरण गुरुवारी (दि. 28) सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यातील या लसीकरणाची सुरुवात अंगणवाडी सेविकांपासून करण्यात आलीआहे. रायगड जिल्ह्यामध्ये सात केंद्राच्या माध्यमातून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये उरण तालुक्यासाठी सिडको ट्रेनिंग सेंटर (बोकडवीरा-उरण) येथे लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेऊन लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात केली. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, समन्वयक संतोष पवार, राजेंद्र मढवी, डॉ. लतिका पोवळे व इतर स्टाफ उपस्थित होते.