Breaking News

पार्थचे ‘ते’ कृत्य चुकीचेच!

पंढरपूर : प्रतिनिधी

पार्थ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ख्रिस्ती धर्मगुरूकडे जाण्याचे कृत्य चुकीचेच होते. त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली, मात्र मी त्याला समजावून सांगितले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवत असलेलेपार्थ पवार हे वारंवार ट्रोल होत आहेत. उच्चविद्याविभूषित, मॉडर्न अशी ओळख निर्माण केलेल्या पार्थ यांनी चार दिवसांपूर्वी वादग्रस्त फादर डेव्हिड सिल्व्हवे यांची भेट घेत दर्शन घेतले. या वेळी फादर सिल्व्हवे यांच्याकडून पार्थ यांना ‘तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात’ अशा आशीवार्द देण्यात आला. दापोडीतील चर्चमध्ये हा सारा प्रकार घडला. त्यावरून नेटिझन्सनी पार्थ यांना पुन्हा एकदा धारेवर धरत त्यांची खिल्ली उडविली होती.

या प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सोबतची मंडळी आग्रह धरतात आणि मग जावे लागते. ही गोष्ट मी केली असती, तर ती चूक ठरली असती, पण पार्थकडून ते नकळत झाले. पार्थ तरुण आहे, तो चुकला तर लगेच फाशी द्याल का, अशी आगपाखडही त्यांनी या वेळी माध्यमांवर केली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply