Breaking News

बॅडमिंटन स्पर्धेत रिचा दोशी, आर्या गांधीने मारली बाजी

माणगाव : प्रतिनिधी

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात कोकण विषानेमा ज्ञाती मंडळ अंतर्गत गुजराथी समाजाच्या बॅडमिंटन, लगोरी व गोळफेक स्पर्धेचे आयोजन 30 जानेवारी रोजी करण्यात आले होते. यातील बॅडमिंटन डबल्स स्पर्धेत रिचा दोशी आणि आर्या गांधी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त तुषार दोशी, आंतरराष्ट्रीय लगोरी असोसिएशनचे सचिव संदीप गुरव उपस्थित होते. स्पर्धा कोकण विषानेमा ज्ञाती मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गांधी यांच्या अध्यक्षखाली झाली. स्पर्धेसाठी कार्याध्यक्ष रूपेश शेट, उपाध्यक्ष सुबोध मेथा व पदाधिकार्‍यांचे सहकार्य लाभले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply