Breaking News

गुरव समाज संघटनेकडून संदीप गुरवचा गौरव

नागोठणे : प्रतिनिधी

थायलंडमध्ये होणार्‍या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल व्हीलचेअर तलवारबाजीपटू संदीप गुरव याचा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला. अखिल गुरव समाज संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नवल शेवाळे यांनी संदीप गुरवच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गुरव समाज संघटनेचे पदाधिकारी तसेच नागोठणे गुरव समाजाच्या अनिता गुरव, मिलिंद गुरव, भरत गुरव, अ‍ॅड. प्रिया गुरव, कल्याणी गुरव आदी सोबत होते. संदीप गुरव याने दिव्यांगावर मात करून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्याची दखल घेत राज्य शासनाकडून क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार संदीपला मिळालेला आहे.  नुकत्याच प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संदीपला गौरविण्यात आले होते. ‘गुरव समाजाच्या वतीने होत असलेला माझा गौरव ही माझ्या दृष्टीने सन्मानाची बाब आहे. आजचा हा सत्कार मला कायम स्फुरण देणार असून, आगामी आशियाई स्पर्धेत नक्कीच ठसा उमटवून समाजाचे नाव आणखी मोठे करण्याचा प्रयत्न करीन’, असे संदीप गुरव यांनी या वेळी सांगितले.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply