Friday , September 22 2023

म्हसळ्यात कॅपिझ शेलचा अवैध साठा जप्त; पाच जण ताब्यात

अलिबाग : प्रतिनिधी
वन विभागाच्या पथकाने म्हसळा तालुक्यातील देवघर येथे सुरू असलेल्या कॅपिझ शेल या सागरी वन्यजीवाच्या अवशेषांचा अवैध व्यापारावर मंगळवारी (दि. 4) धाड टाकली. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रोहा उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून देवघर येथील सर्व्हे क्रमांक 1/3 या ठिकाणी कॅपिझ शेलच्या अवशेषांचा अवैध व्यापार सुरू होता. तेथे म्हसळा वनक्षेत्रपाल श्री. पांढरकामे व त्यांच्या अधिनस्त कर्मचार्‍यांनी मंगळवारी धाड टाकली असता एका ट्रकमध्ये (आरजे 22 जीबी 2387) कॅपिझ शेलचे अवशेष प्लास्टिक गोणीमध्ये भरून ठेवलेला आढळून आला. याबाबत अधिक चौकशी केली असता या ठिकाणी काही लोक या समुद्रजीवाच्या अवशेषांचा खरेदी विक्री व्यवहार करीत असल्याचे आढळून आले. हा वन्यजीव संरक्षण प्रतिबंधित केलेला आहे.
घटनास्थळी एकूण 30 ते 35 टन मुद्देमाल आढळला. तो वनविभागाने जप्त केला. या प्रकरणी खरेदी विक्री व्यवहार करणारे मुरलीधर महादेव महामुणकर, धनंजय मारूती बनसोडे, रोहित अरविंद सादरे, गोपाळसिंग पिरसिंज राजपूत, प्रेमदास श्रवणदास (रा. राजस्थान) यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चे कलम 9,39,44, 48, 48, 50 (1) उ 51नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेप्रकरणी अधिक तपास रोहा उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत व सहायक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply