Breaking News

युगपरिवर्तक नाटक लोक-शास्त्र सावित्री

पनवेल : रामप्रहर वृत्त

थिएटर ऑफ रेलेवन्सचे शुभचिंतक आणि अभ्यासक माणुसकीचा समाज निर्माण करण्यासाठी, न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणाचे क्रांतिकारी सूत्र घेऊन, नवी पिढी घडवण्याचा संकल्प करून, सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे युगपरिवर्तक नाटक लोक-शास्त्र सावित्री रविवारी (दि. 21) सकाळी 11.30 वाजता पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात प्रस्तुत होणार आहे.

या नाटकामध्ये अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे, साक्षी खामकर,प्रियांका कांबळे, तुषार म्हस्के, स्वाती वाघ हे कलाकार असून नाटकाची वेळी 90 मिनिटे आहे.

जनमानसात सावित्री बाई फुलेंची ओळख आहे, त्यांचे नाव आहे, परंतु त्यांचे तत्वच रुजले नाही आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया लोक-शास्त्र सावित्री हे नाटक करते. प्रत्येकाच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने गळते, हे आपण ओळखले नाही तर ती गळत राहणार, हे नाटक त्याला चिन्हीत करते. सावित्रीने दिशा दाखवली, परंतु आपण जागतिकीकरणाने रचलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत आलो. सावित्रीच्या वाटेवर चालणे म्हणजे विचारांच्या वाटेवर चालणे जे आज अभावाने घडते.

भारताची जनता आणि भारतीय महिला या दोघांचेही निर्णय कोणीतरी दुसरं घेतं आणि ते सहन करतात, शोषणाचे बळी पडतात पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत. भारतात आज कितीजण आहेत जे सावित्रीच्या पुढाकाराने शिकले, पण सवित्री घडवू शकले नाहीत. कारण प्रश्न आहे रचनात्मक पुढाकाराचा, न्यायसंगत वागण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा! माझ्यासाठी पुढाकार कोणीतरी दुसरे घेणार? या मानसिकतेवर लोक- शास्त्र सावित्री हे नाटक वैचारिक प्रहार करते. कला माणसात विवेक जागवते, माणसाला माणूस असण्याचा बोध करून देते.

कलासत्वाला मानवतेसाठी व विश्वाच्या सौहार्दासाठी रचणारा सृजनकार शाश्वत माणूस म्हणून काळासोबत लढतो. आपला काळ निर्माण करतो. थिएटर ऑफ रेलेवन्स नाटयसिध्दांताचे लोक- शास्त्र सावित्री हे नाटक युगपरिवर्तनाचा काळ रचते.

परिवर्तनाच्या वाटेवर सांस्कृतिक सृजनकार मनुष्याला हिंसेपासून अहिंसेकडे, आत्महीनतेपासून आत्मबळाकडे, विकारांपासून विचारांकडे, वर्चस्ववादापासून समग्रतेकडे आणि व्यक्तीला सार्वभौमिकतेच्या प्राकृतिक न्याय आणि विविधतेचे सहअस्तित्व व विवेकाच्या दिशेने उत्प्रेरित करतात.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply