लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा उपक्रम; सभागृह नेते परेश ठाकूर यांची विशेष उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून 2021 रोजी 70 वा वाढदिवस आहे. यानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्र सहचिटणीस व पत्रकार मित्र असोशिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी 70 सामाजिक उपक्रम करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार या उपक्रमांची सुरुवात शुक्रवारी (दि. 5)सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत पनवेलमधील युनियन हॉटेल येथे गरीब-गरजू लहान मुलांना मिसळ महोत्सवातून करण्यात आली.
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, केवल महाडिक यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याप्रती असलेले प्रेम व आदर व जिव्हाळा यामुळे त्यांनी 70 सामाजिक कार्यक्रम राबविण्याची संकल्पना अतिशय उत्तम असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिसळ युनियन हॉटेल सुनिल खळदे यांची फेमस मिसळ गोर-गरीब लहान मुलांना खाऊ घालून करण्यात आली. हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. त्यांच्या पुढील सर्व कार्यक्रमांना मी भरभरून शुभेच्छा देतो.
या वेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांचा वाढदिवसदेखील सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. या उपक्रमास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण, सरचिटणीस चंद्रकांत धडके, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, सचिन लोखंडे, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुंद्रेकर, सचिव सुरेश भोईर, खांदा कॉलनी अध्यक्ष मछिंद्र पाटील, कोळखा पेठ अध्यक्ष आनंद सुरते, सदाशिव मोरे, सुनील वरेकर, सचिन स्वामी, विजय शिंदे, ओमकार महाडिक, पत्रकार प्रवीण मोहोकर, रवींद्र गायकवाड, सुमंत नलावडे व लक्ष्मण ठाकूर यांच्यासह पनवेल परिसरातील नागरिक उपस्थित होते. युनियन हॉटेलचे मालक सुनील खळदे यांनी याउपक्रमास विशेष सहकार्य केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper