Breaking News

अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या लिलावात

मुंबई : प्रतिनिधी
आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया होणार आहे. या वेळी अनेक नवोदित खेळाडूंनी नोंदणी केली आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनचाही या लिलावात समावेश आहे. 20 लाख रुपये त्याची मूळ किंमत आहे.
लिलावासाठी 814 भारतीय आणि 283 परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. यात वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक 56 क्रिकेटपटूंचा समावेश आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे 42 आणि दक्षिण आफ्रिकेचे 38 खेळाडू उपलब्ध आहेत. संलग्न राष्ट्रांच्याही 27 खेळाडूंची यात नोंद आहे. लिलाव प्रक्रियेला 18 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता प्रारंभ होईल. प्रत्येक संघात कमाल 25 खेळाडूंना स्थान देता येते.
लिलावासाठी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि भारताच्या एस. श्रीसंत यांच्यासह 1097 क्रिकेटपटूंची नोंद झाली आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी लिलावातून माघार घेतली आहे. हरभजन सिंग, केदार जाधव, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोईन अली, सॅम बिलिंग्स, जेसन रॉय, मार्क वूड, लियाम प्लंकेट आणि कॉलिन इनग्राम यांचा दोन कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह समावेश करण्यात आला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply