महाड : प्रतिनिधी
शहरातल्या समाधान सामाजिक संस्थेने नुकतीच रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गडावरील होळीचा माळ, बाजारपेठ, राजसदर, जगदिश्वर मंदिर परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्या पद्दतीने विल्हेवाट लावली. या मोहिमेत संस्थेचे सुयोग निकम, जयंत कदम, भारत वडके, मंगेश सुकूम, गणेश महांगरे, संजय राहिलकर, सचिन सुतार, राजेंद्र पांचाळ, अमृत पाटील आणि कार्यकर्ते तसेच बच्चे कंपनीने सहभाग घेतला होता. गेल्या दहा वर्षापासून समाधान सामाजिक संस्थेतर्फे रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येते.