Breaking News

कोपर येथे पाण्याच्या पंपाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त

गेल्या काही काळापासून कोपर गाव येथे पाण्याचा तुटवडा येथील नागरिकांना भासत होता. या समस्येची दखल घेत गव्हाण ग्रामपंचायतीच्या शेषफंडातून पाण्याचा पंप, तसेच पाईप लाईन बसविण्यात आली आहे. या पंपाचे लोकार्पण पनवेल पंचायत समिती सदस्या तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. गव्हाण ग्रामपंचायतीतील कोपर गावामधील पाण्याच्या तुटवड्यासंदर्भात गव्हाण ग्रामपंचायतीच्या शेषफंडातून सहा इंचाची पाईप लाईन, तसेच पंप बसविण्याचे काम करण्यात आले. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. या पंपाच्या लोकार्पणाच्या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे सदस्य विजय घरत, रोशन म्हात्रे, सदस्या कामिनी कोळी, योगिता भगत, माई भोईर, सुनीता घरत, उषा देशमुख, भाऊ भोईर, दयानंद घरत, रमेश ठाकूर, सुनील पाटील अनंता ठाकूर, बाळाराम घरत, युवक अध्यक्ष सुधीर ठाकूर, गजानन घरत, काशीनाथ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply