कर्जत : बातमीदार
तालुक्यातील वाकस ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर भारतीय जनता पक्षाच्या रंजना विठ्ठल भागीत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नेरळ जवळील वाकस ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच असलेल्या जगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच सुलक्षणा संजय तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी उपसरपंच पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या रंजना विठ्ठल भागीत यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे सरपंच सुलक्षणा तांबोळी यांनी उपसरपंच पदावर रंजना भागीत यांची निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी यांना ग्रामविकास अधिकारी तारामती दातीर यांनी सहकार्य केले.
निकाल जाहीर होताच भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे, कर्जतच्या नगरसेविका स्वामींनी मांजरे, महिला मोर्चाच्या कर्जत शहर अध्यक्ष स्नेहा गोगटे तसेच माधव कोळंबे, केशव तरे, उत्तम तिखंडे, अंकुश मुने, मंगेश फुलावरे, गिरुनाथ सोनावळे, सर्वेश गोगटे, माजी उपसरपंच सुबोध जगे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच रंजना भागीत यांचे अभिनंदन केले.